पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनकडून विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय विज्ञान संस्थेच्या नवता आणि विकास संस्थेअंतर्गत, बंगळुरू मधल्या पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनं एक विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित केली आहे.कोविड १९ च्या नमुन्यांमधील रक्तामधल्या एकंदर प्रतिपिंडांच्या केंद्रीकरणाचा अंदाज या चाचणी द्वारे बांधता येऊ शकतो. भारतीय औषध नियामक मंडळानं या संस्थेला उत्पादन आणि विक्रीसाठी मान्यता दिली असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानंही सहमती दर्शवली आहे.