राज्यात ११ हजार ४९२ लाभार्थ्यांचे लसीकरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी २६ जिल्हयांमधे ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण झालं.

उर्वरीत जिल्हयांमध्ये आजपासून लसीकरण सुरु होत असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठयानुसार राज्यानं या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लशीच्या ३ लाख मात्रा खरेदी केल्या आहेत.