मेहुल चोक्सी डॉमिनिकामधे गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अँटीग्वामधून बेपत्ता झालेला आर्थिक घोटाळ्यातला आरोपी मेहुल चोक्सी डॉमिनिकामधे सापडला असून त्याला भारतात पाठवण्यात येईल असे अँटीग्वाचे प्रधानमंत्री गॅटसन ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की यासंदर्भात आपण डॉमिनिकाच्या प्रधानमंत्र्यांशी बोललो असून चोक्सीला परत पाठवायचे त्यांनी मान्य केले आहे. 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात भारतामधे प्रमुख आरोपी असलेल्या चोक्सीला आता अँटीग्वात प्रवेश मिळणार नाही असे ते म्हणाले. चोक्सी सध्या डॉमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image