गृहमंत्री अमित शहा ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा आज ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि अंदमान निकोबारच्या नायब राज्यपालांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेणार आहेत.

गृह मंत्रालय या चक्रीवादळावर बारकाईने लक्ष ठेवत असून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात राहत आहेत. दरम्यान या चक्रीवादळाशी सामना करण्यासाठी मंत्रालयाने राज्य आपत्ती निवारण दलाला मदतीचा पहिला वितरीत केला आहे. रा

ष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं बोटी, झाडं कापण्याची यंत्र, दूरसंचार साहित्य आणि इतर आवश्यक साहित्यासह ५९ तुकड्या तैनात केल्या असून NDRF च्या १६ तुकड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल याबाबत गृह मंत्र्यांसमवेत राज्ये आणि केंद्रातील उच्चपदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.