कोविडविरुद्ध लढण्यासाठी राज्यातल्या डॉक्टरांनी पुढं येण्याचं मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) :  कोविड विरुद्धचा लढा अधिक प्रखर करण्यासाठी राज्यातल्या डॉक्टरांनी पुढं यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोविड उद्रेकाला आळा घालण्याच्या दृष्टीने फॅमिली डॉक्टर्सना काय करता येईल याविषयी आज आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

कोविडवर हमखास औषध अद्याप उपलब्ध नाही, अनेक रुग्णांना काहीही लक्षणं दिसत नाहीत, कोणाहीमार्फत कोविड विषाणूंचा प्रसार होऊ नये याकरता जनजागृतीची आवश्यकता आहे, कोविडविषयीचे गैरसमज, शंकांचं निरसन करणं आवश्यक आहे. तसंच गृहविलगीकरणातल्या रुग्णांच्या परिस्थितवर लक्ष ठेवून योग्यवेळी उपचार, सल्ला - मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे.

या कामात फॅमिली डॉक्टर म्हणून व्यवसाय करणाऱ्यांनी हातभार लावावा, तसंच जवळच्या जम्बो कोविड केअर रुग्णालयात सेवा द्यावी, असं आवाहन ठाकरे यांनी केलं. पावसाळा तोंडावर आला असल्याने साथीच्या इतर रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन डॉक्टरांनी योगदान द्यावं, शासन डॉक्टसांना पूर्ण सहकार्य करेल असं ते म्हणाले.

राज्यशासनाच्या टास्कफोर्समधल्या तज्ञांनी यावेळी डॉक्टरांशी संवाद साधला, आणि त्यांच्या विविध शंकांचं निरसन केलं

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image