नीरव मोदी याला ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला फरार आरोपी नीरव मोदी याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने सार्वजनिक नोटीस दिली असून, ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. निरव मोदी त्या दिवशी हजर न झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. या संदर्भात सक्त वसुली संचालनालयाने नीरव मोदी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले. नीरव मोदी याची पत्नी अॅमी, बहिण पूर्वी आणि मेव्हणे मैनाक मेहता यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे.