आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेला दुबईत आरंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेला कालपासून दुबई इथं प्रारंभ झाला असून काल पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली.

महिला खेळाडूंनी या स्पर्धेत आपली सात पदकं निश्चित केली आहेत. मेरी कोम, पूजारानी, अनुपमा, लवलीना बोरोहीम, लालबुआत सैही आणि मोनिका यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मोहंमद हसमुद्दिन, शिव थापा आणि सुमित संगवान आज आपल्या खेळाला सुरुवात करतील.

अमित पंघल, वरीन्द्र सिंह, विकास कृष्ण, आशिष कुमार, संजीत आणि नरेंद्र यांच्यासह सहा भारतीय मुष्टियोद्धे खेळाडू उपउपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या स्पर्धेत नऊ पुरुष आणि दहा महिला असे 19 भारतीय मुशियोद्धे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image