मालवाहतुकीसाठीची देय रक्कम ऑनलाईन पद्धतीने भराता येणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालवाहतुकीसाठीची देय रक्कम भरण्यासाठी भारतीय रेल्वेनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता देय रक्कम एफबीडीच्या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल. देय रक्कम भरण्यासाठी नेट बँकींग, एनईएफटी, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि डॅशबोर्डावरच्या युपीआय पर्यायाचा वापर करता येणार आहे.

याअंतर्गत मालवाहतुकीशी संबधित सर्व प्रकारची शुल्क स्विकारली जातील. ही सेवा संपूर्ण दिवसभर उपलब्ध असेल. सेवेचा वापर करण्याआधी ग्राहकांना एपबीडीच्या पोर्टलवर स्वतःची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.