राज्य सरकारने लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणं थांबवावं- रामदास आठवले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने कोविड-१९ प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणे थांबवावे असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना ते काल वार्ताहरांशी बोलत होते. केंद्राने आतापर्यंत सर्वात जास्त लशींचा पुरवठा महाराष्ट्रालाच केला आहे असे सांगून ते म्हणाले की सध्याची वेळ आपसांत दोषारोप करण्याची नसून एकजुटीने संकटाचा सामना करण्याची आहे.