पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराणा प्रताप, गोपालकृष्ण गोखले आणि रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान योद्धा महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. महाराणा प्रताप यांनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि शौर्याने भारत मातेचा गौरव केला असून महाराणा प्रताप यांचा मातृभूमीप्रती केलेला त्याग कायम स्मरणात राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे.

थोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांना मोदी यांनी जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. गोखले यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेत समर्पित केले आणि ते सर्वांसाठी चिरंतन प्रेरणास्थान राहतील असं सांगत मोदी यांनी विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनाही जयंतीनिमित्त अभिवादन केलं असून टागोर यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यास बळ आणि प्रेरणा प्रत्येकाला मिळत राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image