कोरोना आणि म्युकरमायकोसिस रोगावरील औषधांच्या पुरवठ्या संबधी प्रधानमंत्री यांनी आढावा बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्राणवायू आणि औषधांचा साठा आणि पुरवठ्या संबधी आढावा बैठक घेतली. विशेषकरून कोरोना आणि म्युकरमायकोसिस रोगावरील औषधांच्या पुरवठ्याची मोदी यांना माहिती देण्यात आली. देशात विविध ठिकाणी उभारले जात असलेल्या प्राणवायू प्रकल्पांच्या प्रगतीची माहितीही मोदी यांनी जाणून घेतली. अनेक केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते.