फिनटेक स्टार्टअप ‘निवेश’ची १२ कोटी रुपयांची निधी उभारणी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : फिनटेक स्टार्टअप निवेश डॉटकॉमने आयएएन फंडच्या नेतृत्वात १.६ दशलक्ष डॉलर्सचा (१२ कोटी) निधी जमा केला. या फेरीत इतर सह गुंतवणूकदारांनीही सहभाग नोंदवला. यात इंडियन एंजेल नेटवर्क, एलव्ही एंजेल फंडमधील एंजेल गुंतवणूकदारांसह वीर मेहता आणि राघव कपूर यासारख्या एंजेल गुंतवणूकदारांचाही समावेश होता. निवेश हा मोबाइल फर्स्ट डिजिटल प्लॅटफॉर्म असून तो म्युच्युअल फंड आणि इतर वित्तीय उत्पादकांच्या वितरकांना देशात अधिक पाय पसरवण्यासाठी मदत करतो. या मंचाद्वारे वितरकांना त्यांचा बिझनेस वाढवण्यास तसेच नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळते.
नव्याने आलेले भांडवल, उत्पादनांचा पोर्टफोलिओ विस्तारण्यासाठी वापरला जाईल. विशेषत: विमा, कर्ज उत्पादने तसेच भागीदार आणि ग्राहकांसाठी आणखी गुंतवणूक उत्पादने आणली जातील. या विस्तारात ऑटोमेशनद्वारे तंत्रज्ञानातही भर पडेल. जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार योग्य उत्पादनाचा सल्ला दिला जाईल. ऑनबोर्ड भागीदार वाढवणे आणि टीम विस्तारण्याचाही निवेशचा उद्देश आहे.
निवेश डॉटकॉमचे संस्थापक आणि सीईओ अनुराग गर्ग म्हणाले, “आम्ही ग्राहकांच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करून निवेशला एक संपूर्ण स्टॅक प्लॅटफॉर्म बनवण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही या दिशेने शक्य तेवढी उत्पादने पुरवण्याचा प्रयत्न करू. म्युच्युअल फंड्स, कॉर्पोरेट एफडी, विमा, इत्यादीसारख्या आर्थिक उत्पादनांचा भारतातील टीअर २/३/४ शहरांतील वापर वाढवणे, हा आमचा उद्देश आहे. ‘निवेश’ मध्ये देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल-फर्स्ट दृष्टीकोनाचे हायब्रिड मॉडेल वापरतो.”
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.