विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य समाधान अवताडे यांना उपाध्यक्षांकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ

 विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य समाधान अवताडे यांना उपाध्यक्षांकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई : विधानसभेचे सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचेकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानसभेचे सदस्य आशिष शेलार, कॅप्ट. आर. तमिल सेल्वन, संजय केळकर, अनिल पाटील, बाळा भेगडे, राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक याचबरोबर विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेन्द्र भागवत, उपसचिव शिवदर्शन साठ्ये व राजेश तारवी उपस्थित होते.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image