तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा गुजरात आणि दीवला हवाई पाहणी दौरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते वादळामुळे तडाखा बसलेल्या गुजरात आणि दीवचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दौरा केला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी देखील त्यांच्या बरोबर होते.

यावेळी प्रधानमंत्र्यांनी उना, दीव, जाफराबाद आणि महुवा परिसराची हवाई पाहणी केली. प्रधानमंत्री अहमदाबाद इथं वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेणार आहेत.