१८ ते ४४ वयोगटासाठी घेतलेल्या लसी ४५ वर्षांवरील नागरिकांना पुरवणार - आरोग्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ४५ वर्षांवरच्या नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केलं जात आहे आणि साधारण ५ लाख नागरिक हे लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत आणि केंद्र सरकारकडून त्यासाठी पुरवण्यात आलेल्या लसींच्या मात्रा पुरेशा नसल्यामुळे १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य सरकारने खरेदी केलेल्या लसींमधून त्यांना दुसरी मात्रा देण्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच म्युकरमायकोसिस या आजारावरच्या इंजेक्शनच्या १ लाख कुप्या राज्य सरकार खरेदी करणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.