देशात काल ४ हजार १२० कोविड रुग्णांचा मृत्यू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३ लाख ६२ हजार ७२७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, ३ लाख ५२ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ४ हजार १२० रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २ कोटी ३७ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत  १ कोटी ९७ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

देशातल कोरोनामुक्तीचा दर ८३ पूर्णांक २६ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात ३७ लाख १० हजारापेक्षा जास्त अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. ही संख्या आजपर्यंत बाधीत झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत १५ पूर्णांक ६५ शतांश टक्के आहे. 

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या १७ कोटी ७२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १८ लाख ९४ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image