मातृदिनानिमित्त ट्रेल करणार 'आई' मधील प्रतिभेचा गौरव

 


'मॉम्सगॉटटॅलेंट'द्वारे देणार आईमधील प्रतिभेला प्रोत्साहन

मुंबई : प्रत्येक आई एकाचवेळी मार्गदर्शक, शिक्षक, गृहिणी, नोकरदार, मैत्रीण अशा विविध भूमिका पार पाडत असते. याशिवायही प्रत्येक आईमध्ये एक वेगळी प्रतिभाही दडलेली असते. याच प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 'ट्रेल' या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने मातृदिनाच्या निमित्ताने 'मॉम्सगॉटटॅलेंट' या आठवडाभर चालणा-या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. याअंतर्गत ट्रेलच्या यूझर्सना त्यांच्या आईची प्रतिभा किंवा वैशिष्ट्ये सादर करणारा व्हिडिओ ट्रेलवर अपलोड करावयाचा आहे. यापैकी एका विजेत्याला पुढील बिग ट्रेलर होण्याची संधी मिळेल आणि शीर्ष ३ विजेत्यांना ट्रेल शॉप गिफ्ट हँपर मिळेल.

यासोबतच ट्रेलवरील मॉम्मी क्रिएटर शिफा मर्चंट एक पर्यटक असून महामारीदरम्यान तिचा आई होण्याचा आणि यातून काय धडे मिळाले याचा अनुभव शेअर करेल. तर श्रिमा राय आणि सिमोन खाम्बट्‌टा त्यांचा इन्फ्लूएंसर प्रवास वर्णन करेल. तमिळ क्रिएटर श्वेता राव आणि मोनिका प्रेमकुमार या दोघी मम्मी आणि मुलीचे कपडे कसे मॅचिंग करता येतील तसेच मॉम व बेबी वर्कआउट कसे साधता येईल याविषयी सांगतील.

मातृदिनी ट्रेलचे निर्माते त्यांचा कंटेंट आईला समर्पित करतील. क्लिन्स वर्गीस या हॅपीनेस कोच भारतीय मातांकडून आपण काय शिकले पाहिजे यावर बोलतील. गीतिका चक्रवर्ती या त्यांच्या आईचा जुना लूक शेअर करतील. गिया कश्यप आपल्या आईकडून शिकलेले स्किनकेअर रुटिन शेअर करेल, नित्या नरेश तिच्या आईच्या आवडीच्या गाण्यांवर ठेका धरेल. आपली निर्मिती शेअर करत हे निर्माते यूझर्सनाही गुंतवून ठेवतील. तसेच मातृदिन कसा साजरा करता येईल याच्या नव्या कल्पनाही सूचवतील.