देशात लवकरच पहिला सामाजिक शेअर बाजार स्थापन होण्याची शक्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लवकरच पहिला सामाजिक शेअर बाजार स्थापन होण्याची शक्यता आहे. देशातल्या विविध कॉर्पोरेट कंपन्या, लघु आणि मध्यम उद्योग तसंच स्टार्टअप  कंपन्या ज्याप्रमाणे देश आणि परदेशातल्या शेअर बाजारातून निधी उभारतात, त्याचप्रमाणे सामाजिक संस्थांनाही निधी उभारता यावा, हा यामागचा उद्देश आहे.

यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक वर्ष २०१०-२० च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती. त्यानंतर सेबीनं नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. हर्षकुमार भानवाला यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक गटाची स्थापना केली होती.

या तांत्रिक गटानं महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत. या शिफारसींनुसार सामाजिक कार्याच्या उद्देशानं काम करणाऱ्या संस्थांची या शेअर बाजारात नोंदणी होऊ शकते. अशा नोंदणीकृत संस्था समभाग, म्युच्युअल फंड, झिरो-कुपन झिरो प्रिन्सिपल बाँड्स, सोशल इम्पॅक्ट फंडचा वापर करून निधी उभारू शकतात असं या शिफारशींमधे म्हटलं आहे.

अशा सामाजिक शेअर बाजारात कॉरपोरेट कंपन्यांच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या संस्था, राजकीय आणि धार्मिक संघटना, व्यवसायिक तंसच कामगार संघटना, पायाभूत सुविधा उभारणाऱ्या कंपन्या आणि परवडणारी घरं वगळता, इतर स्वरुपाची घरं तसंच इमारती बांधणाऱ्या कंपन्यांना नोंदणी करायला परवानगी देऊ नये, असंही या शिफारशींमधे म्हटलं आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image