राज्यातल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येतील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल दिली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व शाखांसह नर्सिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षाही याच काळात होणार आहेत. मॉडर्न मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसंच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजीच्या परीक्षाही या परीक्षांसोबतच होतील.