भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपी गौतम नवलखा यांचा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं होतं. टक केल्यापासून ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. मात्र नवलखा यांना ३४ दिवस घरातच ठेवल्यानं ९० दिवसांची मर्यादा इथं लागू होत नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलं होते.