भारत ब्रिटन द्वीपक्षीय संबंध उंचीवर नेण्यासाठी महत्वाकांक्षी आराखड्याला स्वीकृतीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटनचे समपदस्थ बोरिस जॉन्सन यांनी द्विपक्षीय संबंध सर्वंकष धोरणात्मक पातळीपर्यंत उंचावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी आराखड्याला अर्थात रोडमॅप २०३० ला स्वीकृती दिली आहे. या रोडमॅपमुळे दोन्ही देशातील नागरिकांचा परस्परांशी संपर्क वाढण्यासोबतच व्यापार आणि अर्थव्यवस्था, संरक्षण, हवामान बदलांविरोधातील कृती, तसंच आरोग्य या क्षेत्रांमधील संबंध वाढून ते आणखी बळकट होण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.काल या दोन नेत्यांमध्ये झालेल्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत कोविड-१९ ची स्थिती आणि या साथीविरुद्धच्या लढाईतलं उभय देशांच्या सहकार्यासह कोरोना प्रतिबंधक लसींबाबतची यशस्वी भागीदारी या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या व लाटेचा उद्रेक झाल्यानंतर ब्रिटननं तातडीनं वैद्यकीय मदत पाठविल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान जॉन्सन यांचे आभार मानले.तर गेल्या वर्षभरात भारतानं ब्रिटनसह इतर अनेक देशांना औषधं आणि लसींचा पुरवठा केल्याबद्दल जॉन्सन यांनी भारताचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटनचे समपदस्थ बोरिस जॉन्सन यांनी द्विपक्षीय संबंध सर्वंकष धोरणात्मक पातळीपर्यंत उंचावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी आराखड्याला अर्थात रोडमॅप २०३० ला स्वीकृती दिली आहे. या रोडमॅपमुळे दोन्ही देशातील नागरिकांचा परस्परांशी संपर्क वाढण्यासोबतच व्यापार आणि अर्थव्यवस्था, संरक्षण, हवामान बदलांविरोधातील कृती, तसंच आरोग्य या क्षेत्रांमधील संबंध वाढून ते आणखी बळकट होण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.काल या दोन नेत्यांमध्ये झालेल्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत कोविड-१९ ची स्थिती आणि या साथीविरुद्धच्या लढाईतलं उभय देशांच्या सहकार्यासह कोरोना प्रतिबंधक लसींबाबतची यशस्वी भागीदारी या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या व लाटेचा उद्रेक झाल्यानंतर ब्रिटननं तातडीनं वैद्यकीय मदत पाठविल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान जॉन्सन यांचे आभार मानले.तर गेल्या वर्षभरात भारतानं ब्रिटनसह इतर अनेक देशांना औषधं आणि लसींचा पुरवठा केल्याबद्दल जॉन्सन यांनी भारताचं कौतुक केलं.

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटनचे समपदस्थ बोरिस जॉन्सन यांनी द्विपक्षीय संबंध सर्वंकष धोरणात्मक पातळीपर्यंत उंचावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी आराखड्याला अर्थात रोडमॅप २०३० ला स्वीकृती दिली आहे.

या रोडमॅपमुळे दोन्ही देशातील नागरिकांचा परस्परांशी संपर्क वाढण्यासोबतच व्यापार आणि अर्थव्यवस्था, संरक्षण, हवामान बदलांविरोधातील कृती, तसंच आरोग्य या क्षेत्रांमधील संबंध वाढून ते आणखी बळकट होण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.काल या दोन नेत्यांमध्ये झालेल्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत कोविड-१९ ची स्थिती आणि या साथीविरुद्धच्या लढाईतलं उभय देशांच्या सहकार्यासह कोरोना प्रतिबंधक लसींबाबतची यशस्वी भागीदारी या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या व लाटेचा उद्रेक झाल्यानंतर ब्रिटननं तातडीनं वैद्यकीय मदत पाठविल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान जॉन्सन यांचे आभार मानले.तर गेल्या वर्षभरात भारतानं ब्रिटनसह इतर अनेक देशांना औषधं आणि लसींचा पुरवठा केल्याबद्दल जॉन्सन यांनी भारताचं कौतुक केलं.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image