आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत नादीर ओदाहला हरवून शिव थापा याची सलग पाचव्या पदकाची निश्चिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत, भारतीय मुष्टियोद्धा शिव थापा यानं दुबई इथं काल पुरुषांच्या 64 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीमध्ये कुवेतच्या नादीर ओदाह याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि आपल्या सलग पाचव्या पदकाची निश्चिती केली. उपांत्य फेरीत थापाची लढत माजी विजेता ताजिकीस्तानचा बखोदर उसमोनोव यांच्यासोबत होणार आहे. थापानं 2013 मध्ये सुवर्ण, 2017 मध्ये रौप्य तर 2015 आणि 2019च्या या स्पर्धांमध्ये दोन कांस्यपदकं मिळवली आहेत.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image