कोविडसाठी आरक्षित कोणत्याही रुग्णखाटांची अनधिकृतपणे विक्री होत नाही - इकबालसिंह चहल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविडसाठी आरक्षित कोणत्याही रुग्णखाटांची अनधिकृतपणे विक्री होत नसल्याचं पालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात माध्यमांमध्ये पसरलेलं वृत्त निराधार आणि खोटं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात जे कोणी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिकेच्या रुग्णालयांमधल्या बेड वितरणाबाबत अधिक दक्षता घ्यावी असं आवाहनही चहल यांनी केलं आहे.