खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक- हसन मुश्रीफ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचं दिसत आहे. असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केले. काही खासगी दवाखान्यात पैसे मिळवण्यासाठी धडपड सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. वेळेत रुग्ण दाखल होऊनही ज्या दवाखान्यात रुग्ण दगावत आहेत अशा दवाखान्यांची फेर ऑडिट करण्याची विनंती करणार असल्याचे मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. इथे टास्क फोर्सची काहीही गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे समाधान होईल असे प्रयत्न महाविकास आघाडी करेल, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना दिली. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

गोकुळ दूध प्रकल्पात कमीत कमी उत्पादन खर्चात दूधउत्पादक शेतकऱ्यांना जास्त दर देण्यासाठी आपले व्यवस्थापन वचनबद्ध असल्याचे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.