विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याची भाजपचे राज्य महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्युत विभागाच्या सर्व कंपन्यातील कर्मचाऱ्यांना पहिल्या फळीचे कर्मचारी - फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून घोषित करुन त्यांचं लसीकरण करावं अशी मागणी भाजपचे राज्य महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात केली. यासंदर्भातील एक पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.

जे वीज कर्मचारी या करोना संक्रमण काळात मृत्यूमुखी पडले त्यांना ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. पूर्व विदर्भातल्या धान शेतकऱ्यांचे उन्हाळी धानाची खरेदी करण्यासाठी राज्य शासनानं तत्परता दाखवावी. या खरेदीच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच क्रांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लक्षात घ्यावं, असंही बावनकुळे यांनी सांगितल.