गरजू विकसनशील देशांना लस देण्याच्या अमेरिकेच्या घोषणेचं चीनकडून स्वागत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढ्यासाठी जगातील गरजू विकसनशील देशांना अमेरिका ८ कोटी लसींच्या मात्रा मोफत देणार आहे अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी नुकतीच केली आहे, त्याचे चीनने स्वागत केले आहे.

मात्र चीन आणि रशियाने यापूर्वीच जगातील गरीब देशांना १ कोटी लसीच्या मात्रा मोफत द्यायचे जाहीर केले होत, त्या तुलनेत अमेरिकेने ८ कोटी लस मोफत देण्याची केलेली घोषणा मोठी आहे असा टोला ही बायडेन यांनी लगावला होता. त्याबद्दल चीनने नाराजी व्यक्त केली असून, यामध्ये अमेरिकेची चीनप्रती कटू मानसिकताचे दिसून येते अशी टीका चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजीयान यांनी केली आहे.