बोगदे खोदण्याचा खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारण्याचा सल्ला - नीतीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात बोगद्यांच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाअवलंब करणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. यामुळे बोगदे निर्मितीसाठीचा खर्च कमी होऊ शकतो असं ते म्हणाले.

बोगद्याच्या निर्मितीतील सध्याचे प्रवाह,नवोन्मेश आणि भविष्यातील संकल्पना या बाबत एका आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये ते बोलत होते. स्मार्टशहरं, रस्ते आणि बोगद्यांलगतच्या अन्य सुविधांच्या निर्मितीमुळे महसुलात वाढ होऊ शकते असे ते म्हणाले.

सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नकरता बोगदे निर्माण करण्याचं किफायतशीर तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी संबंधितयंत्रणांनी प्रयत्न करावेत असे गडकरी म्हणाले.