म्युकरमायकोसिसच्या पार्श्वभूमीवर राज्यांना अॅम्फोटिसीरिन-बी औषधाच्या २३ हजार ६८० अतिरिक्त कुप्या वितरित करण्याच्या रसायनमंत्र्यांचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौ़डा यांनी आज सांगितलं की, विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराच्या वाढत्या प्रकरणांचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर अॅम्फोटिसीरिन-बी औषधाच्या २३ हजार ६८० अतिरिक्त कुप्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत. देशात एकूण ८ हजार ८४८ रूग्ण असून त्यानुसारच वाटप केलं असल्याचं गौडा यांनी सांगितलं.