कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं  कोविड प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत 21 कोटींच्यावर  मात्रा दिल्या असून कोविड-19 लसीकरण कार्यक्रमातला मोठा  टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या साथीचा प्रतिबंध आणि तिचं व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीनं सरकारनं सर्वंकष धोरण आखलं असून चाचण्या, संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, आणि कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन यासोबतच लसीकरण हा देखील या धोरणाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

काल दिवसभरात 28,09,000 हून जास्त लाभार्थींना लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी जवळपास 25,11,000 लाभार्थींना पहिली तर सुमारे तीन लाख लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. काल 18 ते 44 वर्षे वयोगटातल्या  14,15,000 लाभार्थींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे.  लसीकरण अभियानाचा 3 रा टप्पा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 82 लाखांच्या वर लाभार्थींना लसीची पहिली मात्रा टोचण्यात आली आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image