देशात आतापर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या 18 कोटी 69 लाख मात्रा देण्यात आल्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या 18 कोटी 69 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. सुमारे 96 लाख 85 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर 66 लाख 67 कर्मचाऱ्यांचं लसीकरण दोन्ही मात्रा घेऊन पूर्ण झालं आहे. एक कोटी 46 लाख आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा तर 82 लाखांहून अधिक आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.