देशात आतापर्यंत ७ कोटी ६० लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या सुमारे ७ कोटी ६० लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.हा टप्पा अवघ्या ७८ दिवसात गाठला असून अत्यंत वेगाने लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

काल २७ लाख ३८ हजार मात्रा लाभार्थ्यांनी दिल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशभरात काल ९३ हजार २४९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ६० हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ कोटी १६ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णाक १४ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात सुमारे ६ लाख ९१ हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. काल देशभरात ५१३ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ६२३ वर पोचली आहे.