राजधानी दिल्लीमध्ये आज मध्यरात्रीपासून आठवडाभर टाळेबंदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर झाली असून , मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आजपासून ६ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली आहे . त्यानुसार आज रात्री १० पासून पुढील सोमवारी सकाळपर्यंत दिल्लीत टाळेबंदी असेल.

दिल्लीत गेल्या २४ तासात साडे २३ हजारांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून , त्यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. आरोग्य यंत्रणेवर वाढत्या रुग्ण संख्येचा  प्रचंड  ताण असून दिल्लीत  आय सी यू बेड्स आणि रेमडेसिवीर इंजक्शनचा ही मोठा तुटवडा जाणवत असल्याचं केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत कोरोना चाचण्यांच्या संख्येत ही वाढ केली असून ,दिल्ली सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत आहे. ही लाट रोखायची असेल तर टाळेबंदी आवश्यक असल्याचं सांगून, उप-राज्यपालांच्या बरोबर चर्चा करून हा निर्णय जाहीर करत असल्याचंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, परप्रांतातील मजुरांनी दिल्ली सोडून जाऊ नये असं आवाहन ही केजरीवाल यांनी केलं आहे.   

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image