उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब-राज्यपाल यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून प्रधानमंत्री सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी संवाद साधत आहेत. गेल्या आठवड्यातच पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरना परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेतला होता.