मराठीच्या जगभर प्रसारासाठी विदेशातील मराठीजनांसाठी स्पर्धा

  मराठीच्या जगभर प्रसारासाठी विदेशातील मराठीजनांसाठी स्पर्धा

मुंबई : मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे १० मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या कालावधीत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात भारताबाहेरील रहिवाशांना समाज माध्यमाद्वारे (सोशल मीडिया) सहभागी होता येणार आहे. त्यासाठीची अंतिम तारीख २७ एप्रिल २०२१ पर्यंत वाढविण्यात आली असून स्पर्धकांना आपला सहभाग नोंदविता येणार आहे.

या स्पर्धेच्या निकालाची घोषणा महाराष्ट्र दिनी, दि. १ मे २०२१ रोजी करण्यात येणार आहे. ऑनलाईन होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. जर कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन व्यवस्थित झाले, तर न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन डीसीमध्ये हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा विभागाने दिली आहे. या स्पर्धेत विदेशातील (भारताबाहेर स्थित असलेले भारतीय नागरिक/NRI) नागरिक सहभागी होऊ शकणार आहेत.

स्पर्धेचे स्वरूप

फेसबुक पोस्ट, चलचित्रफीत (व्हिडिओ) – कमीत कमी 1 मिनिट व जास्तीत जास्त 2 मिनिटामध्ये मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारी चलचित्रफीत/व्हिडिओ.

निबंध : 1000 ते 1500 शब्दात मराठी भाषेबद्दल निबंध,

ट्विटर – चलचित्रफीत : ट्विट स्वरूपात कमीत कमी 1 मिनिट व जास्तीत जास्त 2 मिनिटामध्ये मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारी चलचित्रफीत/व्हिडिओ,

ट्विट : मराठीबद्दल एक ट्विट.

मराठी भाषेबद्दल या सर्व माध्यमातून व्यक्त व्हायचे आहे.

अधिक माहितीसाठी www.marathi.gov.in/nri या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा अभिषेक सूर्यवंशी abhishek.nricoordinator@marathi.gov.in यांचेशी संपर्क साधावा.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image