प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड नियंत्रणासाठी लष्कराच्या तयारीचा आढावा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज, देशातल्या कोरोनास्थितीविरोधात लढा देण्यासाठी लष्करानं केलेल्या तयारीचा, आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याशी चर्चा केली. लष्कराच्या वतीनं देशभरात विविध ठिकाणी तात्पुरती रुग्णालयं उभारली जात असल्याची माहिती नरवणे यांनी प्रधानमंत्र्यांना दिली.