पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीचं मतदान आज होत आहे. कोरोनाविषयक सर्व नियम पाळून 524 मतदान केंद्रांवर थोड्याच वेळापूर्वी मतदान सुरू झालं आहे. मतदानाची वेळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत असून 3 लाख 40 हजार 889 मतदार 19 उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. प्रमुख उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भाजपातर्फे समाधान औताडे आपलं भवितव्य आजमावत आहेत. राज्यात सध्या घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात येऊ द्यावे, अशा सूचना राज्य शासनानं प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

Popular posts
बोगदे खोदण्याचा खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारण्याचा सल्ला - नीतीन गडकरी
Image
एमजी मोटर इंडिया तर्फे कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत कोव्हिड लसीकरण मोहिम आयोजित
Image
मातृदिनानिमित्त ट्रेल करणार 'आई' मधील प्रतिभेचा गौरव
Image
सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
पत्रकारांचं तातडीनं लसीकरण कराव, महसूल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Image