शहरातील चष्म्याची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी : आयुक्त राजेश पाटील

 

पिंपरी : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अंशता लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन मधून चष्म्याच्या दुकानांना दुकाने सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा सुधारीत आदेश पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.

ऑप्टीकल ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे या चष्मे विक्री करणा-या संस्थेचे सचिव देवानंद लाहोरे आणि प्रतिनिधींनी 9 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना भेटून दुकाने सुरु ठेवण्याची मागणी करणारे पत्र दिले होते. ॲड. नितीन लांडगे यांनी संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाला सोबत घेऊन आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन वस्तूस्थिती सांगितली कि, मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये ‘ऑप्टीकल आऊटलेट’ ला (चष्म्याची दूकाने) अत्यावश्यक सेवा म्हणून लॉकडाऊन काळात चष्म्याची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतू यावर्षी एप्रिल महिण्यापासुन ‘ब्रेक द चेन’ मध्ये या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला नाही. हि आदेशातील चूक आहे. यासाठी सुधारीत आदेश आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात काढावा अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी आयुक्तांकडे केली.

नागपूर मनपा आयुक्तांनी असा सुधारीत आदेश काढला असल्याचेही लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. आयुक्तांनी याची ताबडतोब दखल घेऊन दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी ‘चष्म्याची दुकाने’ ‘ब्रेक द चेन’ कालावधीत सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देणार सुधारीत आदेश काढला आहे. आता चष्म्याची दुकाने नविन आदेशास अधिन राहून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा आदेश 30 एप्रिल 2021 पर्यंत लागू असल्याचेही आदेशात अनुक्रमांक 7 मध्ये नमूद केले आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

कोरोना कोविड -19 ची साथ राज्यात सुरु झाल्यापासून सर्व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी घरी राहून मोबाईल फोनवर अभ्यास करीत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे लाखो कामगार आहेत. अशा बहुतांश लोकांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरीकांना चष्मा वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी चष्म्यांची दुकाने सुरु असणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी दिलेल्या सुधारीत आदेशामुळे या बहुतांश नागरीकांची सोय होणार आहे. ऑप्टीकल ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे या संस्थेच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे व मनपा आयुक्त राजेश पाटील यांचे आभार मानले.


Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image