१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात १८ वर्षावरील नागरिकांसाठी येत्या १ मे पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु होत असून, त्यासाठीची नावनोंदणी प्रक्रिया आज पासून सुरु होत आहे. देशातील लसीकरण मोहिमेच्या या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिक कोविन पोर्टल cowin.gov.in इथे नावनोंदणी करू शकतात.

या टप्प्यापासून सर्वांसाठी प्रथम नोंदणी अनिवार्य केली असून, नागरिकांना आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आयत्यावेळी नोंदणी करून लस घेता येणार नाही.

सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत लस मिळणार असून, सध्या सुरु असलेली ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरणही पुढे चालूच राहणार आहे.

नागरिकांना मोबाईल नंबरच्या आधारे ही नावनोंदणी करता येणार असून, त्यासाठी पोर्टलवर उपलब्ध अर्ज भरून, छायाचित्र असलेलं अधिकृत ओळखपत्र जोडावं लागणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या सोयीच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पत्ता आणि वेळ ही एसएमएस द्वारे कळवण्यात येईल. हा मेसेज संबंधित लसीकरण केंद्रावर दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.

यापुढे राज्य सरकारे, खाजगी रुग्णालय आणि औद्योगिक संस्था यांना लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस विकत घ्यायला आणि लसीकरण करायला केंद्रसरकारने परवानगी दिली आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image