केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. देशातल्या पहिल्या कन्या शाळेची मुहूर्तमेढ रोवण्याचं श्रेय ज्योतीबांचं आहे. जाती-आधारित सापत्न वागणुकीचा बिमोड करण्याचं त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य भारतीय समाजासाठी म्हत्वपूर्ण आहे असं जावडेकर म्हणाले.