अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन

 


मुंबई : शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग, जोगेश्वरी (पु.), मुंबई-60 यांचे कार्यक्षेत्र बांद्रा ते दहिसर (रेल्वेच्या दोन्ही बाजू) आहे. या कार्यक्षेत्रात काही संस्थानी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. या अनधिकृतपणे सुरु असलेल्या माध्यमिक शाळामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये.        

अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास ते स्वत: जबाबदार असतील, असे बृहन्मुंबई पश्चिमच्या शिक्षण निरीक्षक उर्मिला पारधे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे :-

1). के.पी.पूर्व, दि. प्रागतिक एज्युकेशन सोसायटीचे मरोळ प्रागतिक हायस्कूल, अंधेरी (पूर्व), 5वी ते 10 वी इंग्रजी

2). के.पी.पश्चिम, इत्तेमाद इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, 1 ली ते 10 वी इंग्रजी

3). के.पी.पश्चिम, जे.के. पब्लिक स्कुल, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, 1 ली ते 10 वी इंग्रजी

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image