राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतल्या सर ज. जी. समूह शासकीय रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. ५ मार्चला रोजी त्यांनी याच शासकीय रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला होता. कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केल्याबद्दल राज्यपालांना केंद्र सरकारचं प्रमाणपत्र देण्यात आलं.