राफेल विमानांची आणखी एक तुकडी भारतात दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांची फ्रान्सहून पाठवण्यात आलेली चौथी तुकडी काल भारतात पोहोचली. फ्रान्स च्या इस्तरेस हवाई तळावरून उड्डाण करून 3 राफेल विमानं काल थेट भारतात उतरल्याची माहिती भारतीय वायुसेनेने आपल्या ट्वीटमध्ये दिली आहे. आपल्या प्रवासा दरम्यान यू ए ई - वायु सेने च्या टँकर द्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आलं. दोन्ही हवाई दलातील मजबूत संबंधांचा हा आणखी एक मैलाचा दगड असल्याचं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे.