भारत-ब्रिटन विमानसेवा रद्द करण्याचा एअर इंडियाचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रिटननं लागू केलेल्या नव्या निर्बंधांमुळे भारत-ब्रिटन दरम्यानची विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे, त्यामुळे येत्या शनिवारपासून या महिनाअखेरीपर्यंत भारतातून ब्रीटनकडे जाणारी सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

त्यांचं नवीन वेळापत्रक, तिकिटांचा परतावा याबाबतची माहिती लवकरच पोर्टलवर दिली जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दिल्ली आणि मुंबईमधून ब्रिटनला जाणाऱ्या विमानांचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल, असं एअर इंडियानं म्हटलं आहे.