मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ५०८ अंकांची वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक शेअर बाजाराच्या समिश्र प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या आज १ टक्क्याची वाढ झाली. निर्देशांक आज ५०८ अंकांच्या वाढीसह ४८ हजार ३८७ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४४ अंकांनी वधारुन १४ हजार ४८५ वर पोहोचला.