भाजपा शिष्टमंडळानं घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कोरोना लसी संदर्भात भेट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपा शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कोरोना लसी संदर्भात भेट घेतली.

लॉकडाऊन लागू करायचा असल्यास राज्य सरकारनं व्यापारी, दुकानदारांना आर्थिक मदत द्यावी किंवा त्यांना करांमध्ये सवलत द्यावी. आणि कष्टकरी व सामान्यांच्या खात्यात पैसे जमा करावे अशी मागणी शिष्टमंडळानं केली.

केंद्रानं राज्याला १ कोटी ६ लाखांवर लसीचे डोस दिले आहेत.,राज्य सरकारनं राज्याची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याकडे लक्ष द्यावं. तसेच लसीवरुन राजकारण करू नये. असं बातमीदारांशी बोलताना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.