लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात - पंतप्रधानांचे प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात काल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून सुरु केलेले लसीकरण महोत्सव येत्या १४ एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना पर्यंत चालू राहणार आहे. त्यानिमित्त वयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक स्वच्छतेवर विशेष भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

लसीची एकही मात्रा वाया जाणार नाही, याकडे लक्ष देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. लसीकरणासाठी पंतप्रधानांनी चार बाबींचा प्रामुख्यानं उल्लेख केलेला आहे. वॅक्सीनेट वन म्हणजे अशिक्षितत संच लसीकरण केंद्रावर स्वतः जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी मदत करणं, ट्रीट वन म्हणजे ज्या लोकांकडे तेवढी साधनं नाहीत आणि माहिती नाही अशांना कोरोनावरील उपचारात मदत करणं, सेव्ह वन म्हणजे मी स्वतः मास्क घालून स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करीन, असा मंत्र प्रधानमंत्र्यांनी दिला.

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याची सूचनाही प्रधानमंत्र्यांनी केली. त्याचबरोबर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे. या चार दिवसात व्यक्तीगत स्तर, सामाजिक स्तर आणि प्रशासन स्तरावर लक्ष्य निर्धारित करुन ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image