कोरोना निर्बंधाचं काटेकोर पालन करत हरिद्वार मध्ये कुंभमेळा सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हरीद्वार इथं कालपासून सुरू झालेल्या कुंभमेळ्यावर कोरोनाचं सावट असल्याचं स्पष्टपणे जाणवतं आहे. काल हर की पौडी घाटावर भाविकांची उपस्थिती तुरळकच होती. उपस्थित भाविकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत गंगास्नान केलं. उत्तराखंड सरकारनं कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र आचारसंहिता जारी केली आहे. त्यानुसार कोविड निगेटिव्ह चाचणी अहवाल दाखवल्याशिवाय कुंभमेळ्यात प्रवेश देण्यात येत नाही. कुंभमेळ्यातलं पहिलं शाहीस्नान काल झालं. या पुढील शाहीस्नानाचे मुहूर्त १२, १४ आणि २७ एप्रीलला आहेत त्यावेळीही या नियमांचं काटेकोर पालन करण्यात येईल असं प्रशासनाकडून आज सांगण्यात आलं.