आयपीएल २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं स्पष्टीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल म्हणजेच इंडिअन प्रिमिअर लीग २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर त्यांना बातमीदारांनी हा प्रश्न विचारला होता.

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला पहिला सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर १० एप्रिलला होणार आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ मुंबईत आहेत.