मुंबईत बंद असलेलं लसीकरण पुन्हा सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे गेले काही दिवस मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवर बंद असलेलं लसीकरण आज पुन्हा सुरु झालं. बृहन्मुंबई महानगरपालिकेला काल लसींच्या १ लाख ५८ हजार मात्रांचा साठा मिळाला. त्यामुळे २८ एप्रिल पर्यंतंचं लसीकरण सुरळीत व्हायला मदत होईल असं पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. लसीकरणासाठी दुसरी मात्रा घ्यायला पात्र असलेल्यांना प्राधान्य देणार असल्याचंही पालिकेनं म्हटलं आहे.