धावपटू द्युतीचंद हिला छत्तीसगड सरकारनं ‘वीरनी’ पुरस्कार जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जकार्ता इथल्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी धावपटू द्युतीचंद हिला छत्तीसगड सरकारनं ‘वीरनी’ पुरस्कार जाहीर केला आहे. 14 एप्रिलला दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या एका कार्यक्रमात तिला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना छत्तीसगड सरकारतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.